Asian Squash Team Championships 2022: भारताच्या पुरुष स्क्वॉश संघाने इतिहास रचला, दक्षिण कोरियातील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्ण पदक

रमित टंडनने अली आरामजीचा 11-5, 11-7, 11-4 असा सरळ गेममध्ये पराभव करून भारताला आघाडी मिळवून दिली.

Photo Credit - Twitter

अनुभवी सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष स्क्वॉश संघाने शुक्रवारी दक्षिण कोरियातील चेउंगजू येथे सुवर्ण यश भारतासाठी मिळवले. त्यांनी आशियाई स्क्वॉश सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कुवेतचा 2-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. रमित टंडनने अली आरामजीचा 11-5, 11-7, 11-4 असा सरळ गेममध्ये पराभव करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्याच्यानंतर स्टार खेळाडू सौरव घोषालने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)