India Beat Iran: भारताने इराणचा केला 42-32 असा पराभव, आठव्यांदा जिंकले आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप
भारतीय पुरुष कबड्डी संघाचे हे आठवे आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप विजेतेपद आहे. यापूर्वी 1980, 1988, 2000, 2001, 2002, 2005 आणि 2017 मध्ये जिंकले होते. इराणने 2003 मध्ये विजेतेपद पटकावले होते.
India win Asian Kabaddi Championship 2023: आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 (Asian Kabaddi Championship 2023) आज बुसान, प्रजासत्ताक कोरिया येथे संपन्न झाली. भारतीय कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा (India vs Iran) 42-32 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारतीय पुरुष कबड्डी संघाचे हे आठवे आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप विजेतेपद आहे. यापूर्वी 1980, 1988, 2000, 2001, 2002, 2005 आणि 2017 मध्ये जिंकले होते. इराणने 2003 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पवन सेहरावतच्या सुपर 10 आणि अस्लम इनामदार आणि अर्जुन देशवाल यांच्या मौल्यवान योगदानामुळे भारताने शुक्रवारी बुसान येथील आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत इराणचा 42-32 असा पराभव केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)