Common Wealth Games 2022: स्टार कुस्तीपटू Bajrang Punia ने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत जिंकले सुवर्ण पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.

बजरंग पुनिया (Photo Credit: PTI)

स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत भारताला पहिले सुवर्ण पडल मिळवून दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. भारताला आतापर्यंत सात सुवर्णपदके मिळाली असून पदकांची संख्या 22 वर पोहोचली आहे. बजरंगने अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव केला. बजरंगने यापूर्वी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यावेळचे कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement