Bhagwani Devi: सुवर्णपदक विजेत्या 94 वर्षीय भगवानी देवीचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत, भन्नाट डान्स करत आजीने केला आनंद व्यक्त

94 वर्षाच्या भगवानी देवी डागर यांनी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.

सुवर्णपदक विजेत्या 94 वर्षीय भगवानी देवी (Bhagwani Devi) डागर यांचं दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आजीने देखील भन्नाट डान्स करत भारतासाठी सुवर्णपदक (Gold Medal) मिळवल्याचा आनंद व्यक्त केला आहे. भगवानी देवी डागर यांनी  अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 (Athletics Champion) मध्ये भारतासाठी (India) एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.  भगवानी देवींना ज्येष्ठ नागरिक गटात 100 मीटर शर्यतीत सुवर्ण आणि  शॉटपुटमध्ये कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलेले आहे आणि तीन पदकाची कमाई करत आजी मायदेशी परतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)