All England Championship: भारतीय बॅडमिंटनपटू Lakshya Sen ने रचला इतिहास; ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत मारली धडक
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो केवळ चौथा भारतीय पुरुष आणि एकूण पाचवा भारतीय खेळाडू आहे.
भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऐतिहासिक विजय नोंदवत ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 20 वर्षीय युवा भारतीय शटलरने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 असा तीन गेमच्या लढतीत पराभव करून प्रथमच अंतिम फेरी गाठली. 2001 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या दिग्गज पुलेला गोपीचंद यांच्यानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष शटलर आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो केवळ चौथा भारतीय पुरुष आणि एकूण पाचवा भारतीय खेळाडू आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)