Mohammed Shami पत्नी Hasin Jahan ला देणार महिना 50 हजार रुपये, कोर्टाचा निर्णय

पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हसीन जहाँला हे यश मिळाले आहे.कोर्टाच्या आदेशानुसार क्रिकेटपटू मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला दरमहा 50 हजार रुपये द्यावे लागतील.

पश्चिम बंगालमधील 24 परगणा येथील ADJ 5 फास्ट ट्रॅक कोर्टाने भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरुद्ध (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँच्या (Hasin Jahan) तक्रारीवर निर्णय दिला आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना फास्ट ट्रॅक कोर्टाने मोहम्मद शमीला दरमहा 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हसीन जहाँला हे यश मिळाले आहे.कोर्टाच्या आदेशानुसार क्रिकेटपटू मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला दरमहा 50 हजार रुपये द्यावे लागतील. याआधीही न्यायालयाने आपल्या अल्पवयीन मुलीच्या संगोपनासाठी महिन्याला 80 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा David Miller Video: डेव्हिड मिलरने घेतला आश्चर्यकारक झेल, पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement