Forbes Highest Paid Athletes 2022: Lionel Messi सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू; विराट कोहली टॉप-100 मध्ये एकमेव भारतीय, गेल्यावर्षी किती कमावले जाणून घ्या

फोर्ब्सच्या मते, मेस्सीने गेल्या 12 महिन्यांत एकूण $130 लाख (तब्ब्ल 1007 कोटी रुपये) कमावले आहेत. गेल्या वर्षीही मेस्सीची कमाई सारखीच होती, पण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने $121.2 लाख (तब्ब्ल 939 कोटी रूपे) कमावले आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

Forbes Highest Paid Athletes 2022: बुधवारी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या (Forbes) वार्षिक यादीनुसार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा गेल्या वर्षभरात जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू (Highest Paid Athlete) ठरला आहे. तर टॉप 100 यादीत दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) एकमेव भारतीय आहे. कोहली धावांसाठी धडपडत असेल, परंतु त्याने 33.9 लाख डॉलर्स (261.03 कोटी रुपये) कमाईसह संयुक्त 61 व्या स्थान गाठले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)