भारताने महिला T20 विश्वचषक 2023 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात शानदार विजय नोंदवला. केपटाऊनमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 119 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 18.1 षटकांतच लक्ष्य गाठले. भारताकडून ऋचा घोषने नाबाद 44 धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने अप्रतिम गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. भारताने गेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.
T20 WC 2023. India Women Won by 6 Wicket(s) https://t.co/rm4GUZIzSX #INDvWI #T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)