IND vs SL T20: श्रीलंकाविरूद्ध टीम इंडियाच्या शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर 7 विकेट्सने विजय
भारतीय संघाने आणखी एका शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. धर्मशाला येथे शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 18व्या षटकातच श्रीलंकेकडून 184 धावांचे मजबूत लक्ष्य गाठले. यासह टीम इंडियाने सीरिजवर कब्जा केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग तिसरी टी-20 मालिका जिंकली. यासोबतच रोहित शर्माने घरच्या भूमीवर सर्वाधिक 16 टी-20 सामने जिंकण्याचा मानही आपल्या नावावर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)