Yuvraj Singh: युवराज सिंहने दाखवला लेकाला तो सहा षटकारांचा व्हिडीओ, सोशल मिडीयावर जोरदार चर्चा
युवराज सिंहने तो सहा षटकारांचा व्हिडीओ त्याच्या लेकाला दाखवला आहे. सोशल मिडीयावर सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.
आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 2007 साली युवराज सिंहने (Yuvraj Singh) क्रिकेटमध्ये (Cricket) एक अनोखा इतिहास (History) रचला होता. भारत विरुध्द इंग्लंड (India Vs England) या टी20 (T-20) सामन्यात युवराज सिंहने सहा चेंडूवर सहा षटकार लगावले होते. तसेच या सामन्यात युवीने 12 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकत विक्रम नोंदवला होता. युवराज सिंहने तो सहा षटकारांचा व्हिडीओ (Video) त्याच्या लेकाला दाखवला आहे. सोशल मिडीयावर (Social Media) सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)