जेव्हा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती Pervez Musharraf यांनी Dhoni चे केले होते तोंडभरून कौतुक, हेअरस्टाईलवरुन सर्वांसमोर केली होती ‘ही’ खास विनंती (Watch Video)

2004 आणि 2006 मध्ये भारताच्या पाकिस्तान दौर्‍यादरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलेले मुशर्रफ यांचा खेळाशी जवळचा संबंध होता आणि ते अनेकदा क्रिकेट सामन्यांना हजेरी लावत असत.

MS Dhoni And Pervez Musharraf (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे रविवारी (5 फेब्रुवारी) दुबईत निधन झाले. 2004 आणि 2006 मध्ये भारताच्या पाकिस्तान दौर्‍यादरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलेले मुशर्रफ यांचा खेळाशी जवळचा संबंध होता आणि ते अनेकदा क्रिकेट सामन्यांना हजेरी लावत असत. खरे तर परवेझ मुशर्रफ यांनी एकदा एमएस धोनीला (MS Dhoni) लांब केस कापू नका असा सल्ला दिला होता. भारताने शेवटचा 2006 मध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. लाहोरमधील एकदिवसीय सामन्यादरम्यान बक्षीस वितरण समारंभात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी धोनीचे कौतुक केले आणि सामना जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदनही केले. ते धोनीला म्हटले होते की, तो लांब केसांमध्ये चांगला दिसतो. तसेच, त्यांचा सल्ला आहे की, त्याने केस कापू नये. एमएस धोनी आणि परवेज मुशर्रफ यांच्यातील हा छोटा मात्र लोकप्रिय संवाद इतका व्हायरल झाला होता की, नंतर हा धोनीच्या बायोपिकमध्येही वापरण्यात आला होता.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now