Virat Kohli Net Worth: संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीने रचला नवा विक्रम; 1,000 कोटींच्या पुढे गेले नेट वर्थ- Report
अहवालानुसार, कोहलीने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. कोहलीकडे 18 पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत व प्रत्येक जाहिरात शूटसाठी तो 7.50 ते 10 कोटी रुपये आकारतो. ब्रँड एंडोर्समेंटमधून तो सुमारे 175 कोटी रुपये कमावतो.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीने एकूण संपत्तीच्या बाबतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विराटची एकूण संपत्ती एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे. स्टॉक ग्रोनुसार, कोहलीची एकूण संपत्ती 1,050 कोटी रुपये झाली आहे. कोहलीशिवाय, सध्या जगातील कोणत्याही क्रिकेटरकडे इतकी संपत्ती नाही. कोहलीचा बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत A+ श्रेणीमध्ये समावेश आहे. कोहलीचा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सोबत करार आहे. या डीलमधून त्यांना वर्षाला 15 कोटी रुपये मिळतात. रिपोर्ट्सनुसार, कोहली इंस्टाग्रामवर प्रत्येक पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये आणि ट्विटरवर प्रत्येक पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये आकारतो.
अहवालानुसार, कोहलीने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. कोहलीकडे 18 पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत व प्रत्येक जाहिरात शूटसाठी तो 7.50 ते 10 कोटी रुपये आकारतो. ब्रँड एंडोर्समेंटमधून तो सुमारे 175 कोटी रुपये कमावतो. (हेही वाचा: Virat Kohli House Price: विराट कोहलीच्या मुंबई आणि गुडगावमधील घराची किंमत किती आहे माहित आहे तुम्हाला, नसेल माहित तर घ्या जाणून)