Virat Kohli Big Announcement: भारताच्या शानदार विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा, चाहत्यांमध्ये निराशा

भारताने 17 वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.

Photo Credit - X

भारताने 17 वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या. भारताच्या या विजयानंतर विराट कोहलीने मोठी घोषणा केली. हा आपला शेवटचा टी२० वर्ल्डकप असल्याचे विराट कोहलीने जाहीर केले. हे सांगताना त्यांने आता आपण नवीन खेळाडूंना संधी द्यायला हवी असे देखील म्हटले. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पहायला मिळत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement