Team India Prize Money: 'टीम इंडियाला 11 कोटी देण्याची गरज नव्हती', विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका (Watch Video)

याआधी बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या धनादेश दिला. यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे.

Vijay Wadettiwar | (Photo Credit: twitter)

Vijay Wadettiwar On Cm Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली. याआधी बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या धनादेश दिला. यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. “टीम इंडियाला आता 11 कोटी रुपये देण्याची गरज होती का? खेळाडू देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये बीसीसीआयने दिल आहेत. एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती?” असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)