Video: खेळाडूंचे सामान नेण्यासाठी चक्क जुन्या लहान टेम्पोचा वापर, नॉन एसी बसने प्रवास; नेपाळमध्ये वेस्ट इंडिज संघाचे विचित्र पद्धतीने स्वागत (Watch)

या मालिकेला शनिवार, 27 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, तर शेवटचा सामना 4 मे रोजी होणार आहे.

West Indies A Players In Nepal

West Indies A Players In Nepal: वेस्ट इंडिज 'अ' संघ आज टी20 मालिका खेळण्यासाठी नेपाळमध्ये पोहोचला आहे. अशात संघाच्या खास स्वागताचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नेपाळमध्ये वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंचे सामान नेण्यासाठी चक्क जुन्या लहान टेम्पोचा वापर करण्यात आला. महत्वाचे म्हणजे खेळाडूंनी स्वतः त्यांचे सामान या टेम्पोमध्ये भरले. खेळाडूंना हॉटेलपर्यंत नेण्यासाठी ज्या बसचा वापर केला त्यामध्ये एसीची सुविधा नव्हती. हे सर्व पाहून वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू आश्चर्यचकित झाले. सोशल मिडियावरही या व्हिडिओबाबत अनेक प्रतिक्रिया दिसून येत आहेत.

नेपाळ आणि वेस्ट इंडिज अ यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला शनिवार, 27 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, तर शेवटचा सामना 4 मे रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ क्रिकेट मैदानावर खेळवले जातील. (हेही वाचा: SRH vs RCB Head to Head: आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि बंगलोर यांची एकमेकांविरुद्धची अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)