Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet: वैभव सूर्यवंशीने पुन्हा मनं जिंकली; महेंद्रसिंह धोनीच्या पाया पडला (Video)

आयपीएलमधून नावारूपाला आलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या सर्वांच्या तोंडावर आहे. त्याच्या शतकाची मोठी चर्चा झाली. आता त्याने केलेल्या एका कृतीने त्याने अनेकांची मनं जिंकली.

PC-X

Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet: आयपीएच्या 18 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला आहे. मात्र, राजस्थानचा 14 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने त्याचे नाव मोठे केले. वैभवने शेवटच्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना 57 धावा केल्या. वैभवने (Vaibhav Suryavanshi) या मोसमातून पदार्पण करत संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. चेन्नईविरुद्ध शेवटच्या सामन्यात जाता जाता पुन्हा क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. वैभवने सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी याच्या पाया पडला. वैभवच्या या कृतीने साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं मनं जिंकली. वैभवने धोनीच्या (MS Dhoni) पायाला स्पर्श करत आशिर्वाद घेतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना सामन्यानंतर परंपरेनुसार दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करतात तेव्हा घडली. धोनी आणि वैभव एकमेकांसमोर येताच वैभवने हात न मिळवता थेट धोनीच्या पायाला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. त्यानंतर धोनीने वैभवच्या पाठीवर हात फिरवला आणि संवाद साधला.

वैभव सूर्यवंशी महेंद्रसिंह धोनीच्या पाया पडला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement