U19 World Cup 2022: भारताचा अंडर 19 स्टार खेळाडू नेट सेशनमध्ये MS Dhoni याच्या हेलिकॉप्टर शॉटचा केला सराव, Video पाहून व्हाल अवाक

भारतीय अंडर-19 संघाचा स्टार खेळाडू राजवर्धन हंगरगेकरने वेस्ट इंडिजमध्ये नेट सेशनमध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. आयसीसीने इंस्टाग्रामवर भारताच्या नेट सत्रातील एक व्हिडिओ शेअर केला. विशेष म्हणजे हंगरगेकरने काही प्रसंगी हेलिकॉप्टर शॉट खेळला. हंगरगेकर मोठे फटके खेळण्यात माहीर आहे आणि डावाच्या शेवटी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.

U19 World Cup 2022: भारताचा अंडर 19 स्टार खेळाडू नेट सेशनमध्ये MS Dhoni याच्या हेलिकॉप्टर शॉटचा केला सराव, Video पाहून व्हाल अवाक
राजवर्धन हंगरगेकरने खेळला हेलिकॉप्टर शॉट (Photo Credit: Instagram)

एमएस धोनीने (MS Dhoni) त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हेलिकॉप्टर शॉट (Helicopter Shot) खेळून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आश्चर्यचकित केले. भारताचा अंडर-19 खेळाडू (India U19 Team) राजवर्धन हंगरगेकरने (Rajvardhan Hangargekar) वेस्ट इंडिजमध्ये सराव सत्रादरम्यान धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हंगरगेकरने या प्रसंगी धोनीचा सिग्नेचर शॉट अचूक खेळला. हंगरगेकरला धोनी-स्टाईल शॉट खेळताना पाहून सोशल मीडियावर नेटकरी देखील अवाक् झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2022 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).