SRH vs RCB, IPL 2023 Match 65 Live Streaming: आज हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाईव्ह
आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. त्याचवेळी सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, पण हा सामना जिंकल्याने आरसीबीचा खेळ खराब होऊ शकतो.
आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 65 व्या साखळी सामन्यात, आज (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (SRH vs RCB) संघ आमनेसामने असतील. हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना रंगणार आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. त्याचवेळी सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, पण हा सामना जिंकल्याने आरसीबीचा खेळ खराब होऊ शकतो. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.
Riding high on confidence, @RCBTweets' would leave no stone unturned to fetch a crucial 𝗪 as the #RoadToPlayoffs get's more fierce! 🔥
Tune-in to #SRHvRCB at #IPLonStar
Today | Pre-show at 6:30 PM & LIVE action at 7:30 PM | Star Sports Network#BetterTogether pic.twitter.com/RtZfREpiJk
— Star Sports (@StarSportsIndia) May 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2023 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

