On This Day: रोहित शर्माच्या विश्वविक्रमाला आज 3 वर्षे पूर्ण, एका विश्वचषकात पाच शतक झळकावणारा ठरला पहिला फलंदाज

एका मोसमात पाच शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. या कामगिरीसह रोहित शर्मानं श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकारानं 2015 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकात 4 शतक झळकावली होती.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) तंदुरुस्त झाला असून तो संघात सामील झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे तो कसोटी खेळू शकला नाही, मात्र टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत तो कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आजची तारीख क्वचितच विसरू शकेल. 2019 मध्ये या दिवशी त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात शतकांचा मोठा विक्रम केला. एका मोसमात पाच शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. या कामगिरीसह रोहित शर्मानं श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकारानं 2015 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकात 4 शतक झळकावली होती.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement