MPL 2023: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील सामने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये पाहता येणार विनामूल्य
पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा 29 जून रोजी समारोप होणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे (MCA Cricket Stadium, Pune) खेळले जातील. पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे. अमृता खानविलकर हिच्यासह अन्य कलाकार परफॉर्म करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील सामने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य पाहता येणार आहे.