IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला गेला. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला असुन दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट गमावून 62 धावा केल्या आहे. तर भारताकडे अजुन 36 धावांची आघाडी आहे. भारताकडून दुसऱ्या डावात मुकेश कुमारने 2 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली आहे. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. तसेच, आजच्या दिवशी दुसरीकडे भारताचा पहिला डाव 153 धावांवर गारद झाला आणि 98 धावाची आघाडी घेतली. भारताच्या शेवटच्या पाच फलंदाजाना एकही धाव न करता शुन्यावर विकेट गमावल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 153/4 होती. विराट कोहली आणि केएल राहुल फलंदाजी करत होते. यावेळी राहुल बाद झाल्याने टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)