IPL 2024: संपूर्ण आयपीएल भारतात होणार, बीसीसीआय लवकरच वेळापत्रक करणार जाहीर, जय शाह यांची माहिती

BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Jay Shah (Photo Credit - Twitter)

IPL 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही. दरम्यान, उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) होतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील, असे सांगितल्यावर या अटकळांना पूर्णविराम मिळाला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)