India Beat Bangladesh: सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा दुसरा विजय, बांगलादेशचा 50 धावांनी केला पराभव; उपांत्यफेरीत जवळपास स्थान केले निश्चित

भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला आहे.

IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने उंपात्यफेरीतील जवळपास स्थान पक्के केले आहे. तत्तपुर्वा, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने 196 धावा फळकावर लावल्या. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने 50 सर्वाधिक धावा केल्या तर बांगलादेशकडून तनझिम हसन साकिब आणि रिशाद हुसेन प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 197 धावा करायच्या होत्या पण ते 146 धावा करु शकले. बांगलादेशकडून स्टार फलंदाज नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 40 धावा केल्या. टीम इंडियासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाचा पुढील सुपर-8 सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement