IND vs NZ 2nd ODI: रायपूर मध्ये टीम इंडियाचे झाले जल्लोषात स्वागत, चाहत्यांनी केली तुफान गर्दी, पहा व्हिडीओ

जिथे एकीकडे यजमान संघ (Team India) दुसरा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी किवी संघाला मालिका वाचवण्यासाठी दुसरा सामना जिंकण्याची इच्छा असेल.

IND vs NZ 2nd ODI: रायपूर मध्ये टीम इंडियाचे झाले जल्लोषात स्वागत, चाहत्यांनी केली तुफान गर्दी, पहा व्हिडीओ
Photo Credit - Twitter

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs NZ 2nd ODI) 21 जानेवारी रोजी रायपूर येथे खेळवला जाईल. जिथे एकीकडे यजमान संघ (Team India) दुसरा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी किवी संघाला मालिका वाचवण्यासाठी दुसरा सामना जिंकण्याची इच्छा असेल. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडिया रायपूरला पोहोचली असून तिकडे त्यांचे जोरदार स्वागत झाले आहे. टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रंचड गर्दी केली होती.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2023 10:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).