India Women Won by 7 Wicket: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयाने सुरुवात, पाकिस्तानचा उडवला धुव्वा; स्मृती-शेफालीची दमदार फलंदाजी

आशिया चषकाचा दुसरा सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला आहे.

India Women Won by 7 Wicket: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयाने सुरुवात, पाकिस्तानचा उडवला धुव्वा; स्मृती-शेफालीची दमदार फलंदाजी
Team India (Photo Credit - X)

IND W Beat PAK W, Asia Cup 2024: महिला आशिया चषक 2024 आजपासून सुरू झाला आहे. आशिया चषकाचा दुसरा सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने महिला आशिया चषक स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने 19.2 षटकांत केवळ 108 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीन आणि फातिमा सना यांनी सर्वाधिक 25 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या 14.1 षटकांत तीन विकेट्स गमावून सहज लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर स्मृती मंधानाने 45 धावांची शानदार खेळी केली. पाकिस्तानकडून सय्यदा अरुब शाहने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी संयुक्त अरब अमिरातीसोबत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 09:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).