Blind T20 World Cup 2022: अंधांसाठीचा टी-20 विश्वचषक 2022 भारताच्या खिशात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन

भारताने 277/2 धावा केल्या तर बांगलादेशला केवळ 157/3 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Blind T20 World Cup 2022: अंधांसाठीचा टी-20 विश्वचषक 2022 भारताच्या खिशात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
IND Wins Blind T20 World Cup 2022 (Photo Credit - Twitter)

Blind T20 World Cup 2022: शनिवारी 17 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट पटकावला. भारताने 277/2 धावा केल्या तर बांगलादेशला केवळ 157/3 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराद ठाकुर यांनी अंधांसाठीच्या वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजेता झाल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2022 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).