IND vs SL 3rd T20 Live Update: श्रीलंकेला सातवा धक्का, हार्दिक पांड्याने चमिका करुणारत्नेला केले बाद

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला सातवा मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने श्रीलंकेला सातवा धक्का दिला. त्याने चमिका करुणारत्नेला एलबीडब्ल्यू केले. चमिकाला दोन चेंडूंवर खातेही उघडता आले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement