South Africa vs India, 1st T20I Match Live Score Update: टीम इंडियाचा डाव गडगडला; शतकविर संजू सॅमसनच्या विकेटनंतर हार्दिकही स्वस्तात बाद
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. संजू सॅमसने या सामन्यात चांगली फंलदाजी केली पंरतू तो बाद झाल्यावर हार्दिक पंड्याही स्वस्तात बाद झाला. संजू सॅमसन 50 चेंडूत 107 धावाकरून बाद झाला यानंतर हार्दिक पंड्या 2 धावा करुन बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या 19 षटकारानंतर 6 बाद 194 झाले आहेत.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 1st T20I Match Live Score Update: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 8 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधील पहिला सामना डर्बनमधील (Durban) किंग्समीड (Kingsmead) येथे खेळवला जात आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. गेल्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, टीम इंडियाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. यावेळी दक्षिण आफ्रिका घरच्या मैदानावर बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. संजू सॅमसने या सामन्यात चांगली फंलदाजी केली पंरतू तो बाद झाल्यावर हार्दिक पंड्याही स्वस्तात बाद झाला. संजू सॅमसन 50 चेंडूत 107 धावाकरून बाद झाला यानंतर हार्दिक पंड्या 2 धावा करुन बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या 19 षटकारानंतर 6 बाद 198 झाले आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)