South Africa vs India, 1st T20I Match Live Score Update: भारताला पहिला धक्का; अभिषेक शर्मा 7 धावाकरून बाद

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर अभिषेक शर्मा 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 49/1.

South Africa vs India, 1st T20I Match Live Score Update: भारताला पहिला धक्का; अभिषेक शर्मा 7 धावाकरून बाद

South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 1st T20I Match Live Score Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 8 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधील पहिला सामना डर्बनमधील (Durban) किंग्समीड (Kingsmead) येथे खेळवला जात आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. गेल्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, टीम इंडियाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. यावेळी दक्षिण आफ्रिका घरच्या मैदानावर बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर अभिषेक शर्मा 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 49/1.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2024 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).