SL vs NZ 2nd Test 2024: कामिंडू मेंडिसच्या शतकानंतर कुसल मेंडिसचेही शानदार शतक; श्रीलंकेचा पहिला डाव मजबूत स्थितीत, SL - 596/6
कुसल मेंडिसने 149 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. कुसल मेंडिसचे हे 10 वे कसोटी शतक आहे.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 2nd Test 2024 Day 2 Scorecard: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबरपासून गॉल (Galle) येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकन खेळाडूंची हवा ही पाहायला मिळाली. या सामन्यात कामिंदू मेंडिसने कसोटी सामन्यात 240 चेंडूत 3 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 166 धावा केल्यात त्याच्या पाठोपाठ आता कुसल मेंडिसने देखील शानदार शतक झळकावले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)