KKR vs SRH, IPL 2023 Match 19 Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्स संघाला सहावा धक्का, नितीश राणा पॅव्हेलियनमध्ये परतला

सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर हॅरी ब्रूकने झटपट खेळी करताना शानदार नाबाद धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात 229 धावा करायच्या आहेत.

KKR vs SRH, IPL 2023 Match 19 Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्स संघाला सहावा धक्का, नितीश राणा पॅव्हेलियनमध्ये परतला

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 228 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर हॅरी ब्रूकने झटपट खेळी करताना शानदार नाबाद धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात 229 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला 6 वा मोठा झटका बसला आहे. नितीश राणा 75 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्कोअर 165/6.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2023 11:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).