IND vs BAN 1st Test Day 4 Live Update: बांगलादेशला सहावा धक्का, टीम इंडिया विजयापासून 4 विकेट दूर
दरम्यान, बांगलादेशला 6 वा मोठा धक्का बसला आहे. नुरुल हसन 3 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला.
IND vs BAN 1st: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 बळी घेतले. टीम इंडियाने वेगवान फलंदाजी करताना दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला. सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शानदार शतके झळकावली. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 256 धावा करायच्या आहेत. दरम्यान, बांगलादेशला 6 वा मोठा धक्का बसला आहे. नुरुल हसन 3 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. बांगलादेशचा स्कोअर 257 वर 6 विकेट आहे.
.@akshar2026 picks up his third wicket as Nurul Hasan departs.
Bangladesh lose their 6th wicket.
Live - https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/NlAUaSKNFe
— BCCI (@BCCI) December 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2022 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

