ICC Players of the Month: श्रीलंकेला नडणाऱ्या श्रेयस अय्यर याला ICC कडून बक्षीस जाहीर, बनला फेब्रुवारीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर

ICC Players of the Month: गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध व्हाईट-बॉल मालिकेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला आयसीसीने गेल्या महिन्यात केलेल्या कामगिरीचे मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. 27 वर्षीय फलंदाजाला फेब्रुवारी महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवडण्यात आले आहे.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

ICC Players of the Month: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत पाहुण्या संघाला भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला आयसीसीने गेल्या महिन्यात केलेल्या कामगिरीचे मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध व्हाईट-बॉल मालिकेत टीम इंडियाच्या (Team India) विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 27 वर्षीय फलंदाजाला फेब्रुवारी महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवडण्यात आले आहे. तर महिला गटात न्यूझीलंडच्या अमेलिया केर (Amelia Kerr) हीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now