ICC Award: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दमदार कामगिरी! आयसीसीकडून Shreyas Iyer चा सन्मान; ठरला मार्च 2025 साठीचा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ
भारताच्या 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अय्यर हा एक महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. अय्यरने 243 धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कामगिरी केली.
Shreyas Iyer Wins ICC Men's Player of the Month Award: न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मार्च 2025 साठीचा आयसीसी पुरुष खेळाडू पुरस्कार (ICC Player of the Month Award) जिंकला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर243 धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सर्वात चांगली कामगिरी केली. अय्यरला हा पुरस्काराच्या मिळाल्याचा अर्थ असा की भारताने सलग दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. श्रेयस अय्यरच्या आधी शुभमन गिलने फेब्रुवारीसाठीचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला होता.
श्रेयस अय्यरने आयसीसी पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)