IND vs ENG 3rd Test Day 3: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd Test) खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळण्यासाठी उतरले आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 35 षटकांत दोन गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाला 130.5 षटकात 445 धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दरम्यान, पहिल्या डावात इंग्लडंचा संघ 319 धावावर गारद झाला आहे. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 153 धावांची खेळी खेळली. भारतकडून सिरजने 4 विकेट आणि कुलदीपने - जडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 191/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)