Saurabh Tiwari Retirement: स्टार खेळाडू सौरभ तिवारीचा क्रिकेटला रामराम, राजस्थानविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

झारखंड आणि राजस्थान यांच्यातील 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारा रणजी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.

भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळणारा झारखंडचा क्रिकेटपटू सौरभ तिवारी याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 34 वर्षीय सौरभ काही काळापासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता, तरीही तो सतत देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. सौरभ सध्या झारखंडच्या रणजी संघासोबत आहे. झारखंड आणि राजस्थान यांच्यातील 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारा रणजी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)