Sachin Tendulkar On Virat Kohli: विराट कोहलीच्या शतकानंतर मास्टर ब्लास्टरची खास पोस्ट

हे शतक झळकावताच अनेक दिग्गजांनी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे

Sachin Tendulkar On Virat Kohli: विराट कोहलीच्या शतकानंतर मास्टर ब्लास्टरची खास पोस्ट
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारत विरुद्ध वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने (Virat Kohli) शतक झळकावले. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक ठरले आहे. त्याने 206 चेंडूंचा सामना करत 121 धावांची खेळी केली. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील स्टोरी शेअर करत विराट कोहलीचे कौतुक केले आहे. सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात विराट कोहलीचा फोटो असल्याचे दिसून येत आहे. या फोटोला हटके कॅप्शन देत सचिनने लिहिले की, ' आणखी एक दिवस, आणखी एक शतक.. '

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2023 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).