IND vs SA 3rd T20I: रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज शेवटचा टी-20 सामना खेळणार आहे. संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या सामन्यातून केएल राहुल आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना (India vs South Africa 3rd T20I) मंगळवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याशिवाय त्याने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका आपल्या घरच्या मैदानावर जिंकली आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज शेवटचा टी-20 सामना खेळणार आहे. संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या सामन्यातून केएल राहुल आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. विराट आणि राहुलशिवाय अर्शदीपही आजचा सामना खेळत नाहीये. अर्शदीपच्या जागी मोहम्मद सिराजचा तर विराट आणि राहुलच्या जागी श्रेयस अय्यर आणि उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे.
3RD T20I. India won the toss and elected to field. https://t.co/m8hIQQsobr #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2022 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

