Air Pollution संपवण्यासाठी Rishabh Pant चा जागतीक स्तरावर पुढाकार; 'निरोगी आणि स्वच्छ परिसर' साठी सामूहिक कृतीचे केले आवाहन (Video)

ऋषभ पंत स्वच्छ हवा आणि निरोगी परिसरासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जागतिक बँकेसोबत एकत्र आला आहे. ऋषभ पंत वायू प्रदूषण संपवण्यासाठी लोकांना योग्य कृतीचे आवाहन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Rishabh Pant (Photo Credit- X)

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट कसोटी संघाचा उपकर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) हवा प्रदूषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जागतिक बँकेसोबत एकत्र आला आहे. जागतिक बँकेच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत म्हणाले, "जग हे एक कुटुंब आहे. जग ड्रेसिंग रूमसारखे आहे, आपण सर्वजण एकाच संघासाठी खेळतो. जर आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम केले तर आपण हे एक निरोगी आणि स्वच्छ ठिकाण बनवू शकतो ज्याला प्रत्येक मूल पात्र आहे...". ऋषभ पंत "वायू प्रदूषण संपवण्यासाठी" उपक्रमासाठी जागतिक बँकेत सामील झाला आहे आणि त्याने सर्वांना या कारणासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले आहे.

ऋषभ पंत जागतिक बँकेच्या पुढाकारात सामील:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement