IND vs SA 2nd T20I: रिंकू सिंगच्या जबरदस्त षटकारने स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली (Watch Video)
रिंकू सिंगने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले आहे. या खेळीत रिंकूने 9 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. रिंकूने असा षटकार मारला की मैदानात काच फुटली.
Rinku Singh's Six Broke Media Box Glass: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा रिंकू सिंग नावाचे वादळ पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यात रिंकूने शानदार खेळी केली. त्याची फलंदाजी पाहता तो प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळत आहे असे अजिबात वाटत नव्हते. या सामन्यात रिंकू सिंगने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले आहे. या खेळीत रिंकूने 9 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. रिंकूने असा षटकार मारला की मैदानात काच फुटली. रिंकू सिंगने आपल्या खेळीदरम्यान दोन षटकार मारले असले तरी या दोन षटकारांनी त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांची मने जिंकली. यातील एक षटकार त्याने अशा प्रकारे मारला की स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Rinku Singh's six broke the glass of the media box. (Rajal Arora). pic.twitter.com/juEYkJV5Lk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 12, 2023
Rinku Singh's six broke media box glass. 🔥
- Rinku is insane...!!!!pic.twitter.com/hJazne80PU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2023 11:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

