Rajwardhan Hungergekar Two Wicket: धोनीसोबत खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने घातला धुमाकूळ, एकाच षटकात घेतल्या पाकिस्तानच्या दोन विकेट (Watch Video)

राजवर्धन हंगरगेकरने एकाच षटकात दोन बळी घेत पाकिस्तानला बॅकफूटवर आणले. सॅम अय्युबनंतर त्याने युसूफलाही ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. युसूफलाही खाते उघडता आले नाही.

Rajwardhan Hungergekar Two Wicket: धोनीसोबत खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने घातला धुमाकूळ, एकाच षटकात घेतल्या पाकिस्तानच्या दोन विकेट (Watch Video)

IND vs PAK Score Update: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली युवा भारत अ संघाने सलग पाच सामने जिंकले असून सहावा सामना जिंकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर पाकिस्तान अ संघ भारतावर मात करून सलग तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजवर्धन हंगरगेकरने (Rajwardhan Hungergekar) एकाच षटकात दोन बळी घेत पाकिस्तानला बॅकफूटवर आणले. सॅम अय्युबनंतर त्याने युसूफलाही ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. युसूफलाही खाते उघडता आले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या धावसंख्येने सहा गडी गमावून 100 धावा ओलांडल्या आहेत. कासिम अक्रम आणि मुबासिर खान क्रीजवर आहेत.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).