LSG vs RR IPL 2024 Live Streaming: लखनौ सुपर जायंट्ससमोर राजस्थान रॉयल्सचे तगडे आव्हान, तुम्ही येथे पाहू शकता लाइव्ह सामना

पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

LSG vs RR IPL 2024 Live Streaming: लखनौ सुपर जायंट्ससमोर राजस्थान रॉयल्सचे तगडे आव्हान, तुम्ही येथे पाहू शकता लाइव्ह सामना
RR vs LSG (Photo Credit - Twitter)

LSG vs RR IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (IPL 2024) आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. या मोसमातील 44 वा सामना म्हणजेच आजचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावरील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. या मोसमातील ही दुसरी वेळ असेल, जेव्हा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ एकमेकांसमोर उभे राहतील. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).