इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 23वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्स संघाचा तीन गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 46 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 178 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने 19.2 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 60 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)