CSK vs RR, IPL 2023 Live Score Update: रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी केला पराभव, आर अश्विन आणि युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 50 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 17वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 175 धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक ५२ धावांची तुफानी खेळी खेळली. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 172 धावा करू शकला. चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 50 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Match 17. Rajasthan Royals Won by 3 Run(s) https://t.co/MCaswASydi #TATAIPL #CSKvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

