Rajasthan Beat Lucknow: राजस्थानने लखनौचा सात गडी राखून केला पराभव, सॅमसन आणि ज्युरेल यांची मॅच विनिंग खेळी

आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 44 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या चुरशीच्या सामन्यात राजस्थानने लखनौचा सात विकेट राखुन पराभव केला आहे.

Rajasthan Beat Lucknow: राजस्थानने लखनौचा सात गडी राखून केला पराभव, सॅमसन आणि ज्युरेल यांची मॅच विनिंग खेळी
RR

LSG vs RR, IPL 2024 44th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 44 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या चुरशीच्या सामन्यात राजस्थानने लखनौचा सात विकेट राखुन पराभव केला आहे. तत्तपुर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी लखनौने राजस्थानसमोर 197 धांवांचे लक्ष्य ठेवले. लखनौसाठी सलामीवीर केएल राहुलने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने सर्वाधिक दोन बळी घेतले. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानने 19व्या षटकातच विजय मिळवला. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 71 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. लखनौसाठी मार्कस स्टॉइनिस आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 11:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).