Video: लाईव्ह सामन्यात राडा, पाकिस्तानी अष्टपैलू आणि बांगलादेशी गोलंदाज मैदानावर भिडले; व्हिडिओ व्हायरल

बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले, जिथे एका सामन्यादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. यावेळी खूप गोंधळ झाला.

Photo Credit - X

Mohammad Nawaz and Tanzim Hasan Sakib: पाकिस्तान क्रिकेट आणि बांगलादेश क्रिकेट हे दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये राहतात. आणि जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसमोर येतात तेव्हा मैदानावर अनेकदा गोंधळ दिसून येतो. बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले, जिथे एका सामन्यादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. यावेळी खूप गोंधळ झाला. झाले असे की, मोहम्मद नवाज 18 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. नवाजला बाद केल्यानंतर तन्झीम हसन काहीतरी बोलताना दिसला आणि पुढच्याच क्षणी त्यांचे खांदे एकमेकांवर आदळले. यानंतर दोघेही रागाच्या भरात जवळ आले आणि वातावरण तापले. यादरम्यान, तन्झीमने रागाने नवाजला मैदान सोडण्याचा इशारा केला. परिस्थिती अशी बनली की पंच आणि खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement