Virat Kohli and R Ashwin Emotional Video: निवृत्तीच्या घोषणेनंतर ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला मिठी मारताना आर अश्विन भावूक (Watch Video)

बुधवारी सामन्याच्या शेवटच्या सत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे खेळाडू खेळ पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत असताना कोहली अश्विनला मिठी मारताना दिसला, यावेळी अश्विन खूपच भावूक दिसत होता.

Virat Kohli and R Ashwin Emotional Video (फोटो सौजन्य - X/@StarSportsIndia)

Virat Kohli and R Ashwin Emotional Video:ब्रिस्बेनमधील गाबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी, विराट कोहली आणि आर अश्विन यांचा ड्रेसिंग रूममधील भावनिक क्षणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर अश्विनने आंतरराष्ट्री क्रिकेट (International Cricket) आणि या खेळातील सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी सामन्याच्या शेवटच्या सत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे खेळाडू खेळ पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत असताना कोहली अश्विनला मिठी मारताना दिसला, यावेळी अश्विन खूपच भावूक दिसत होता. स्टार स्पोर्ट्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर सुनील गावस्कर, मार्क निकोलस आणि मॅथ्यू हेडन यांनी अश्विनच्या निवृत्तीवर कमेंट केली. त्यानंतर काही मिनिटांनंतर, स्वत: अश्विनने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला.

विराट कोहली आणि आर अश्विन भावनिक व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now