CSK vs PBKS IPL 2024 Toss Update: पंजाबने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत.

CSK vs PBKS IPL 2024 Toss Update: पंजाबने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
CSK vs PBKS (Photo Credit - X)

CSK vs PBKS IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात बुधवारी सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).