Punjab Beat Chennai: पंजाबने चेन्नईचा सात गडी राखून केला पराभव, बेअरस्टो आणि रोसेओ यांनी खेळली शानदार खेळी

आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात पंजाबने सीएसकेचा सात विकेट राखून पराभव केला आहे.

Punjab Beat Chennai: पंजाबने चेन्नईचा सात गडी राखून केला पराभव, बेअरस्टो आणि रोसेओ यांनी खेळली शानदार खेळी
PBKS

CSK vs PBKS IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात पंजाबने सीएसकेचा सात विकेट राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 62 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने 17.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 46 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जसाठी रिचर्ड ग्लीसन, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 11:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).