PSL 2021 Schedule: पाकिस्तान सुपर लीगच्या स्थगित हंगामास 1 जूनपासून होणार सुरुवात, ‘या’ स्टेडियमवर खेळले जाणार उर्वरित सामने
कोरोना व्हायरस प्रकरणांमुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. लाहोर कलंदर विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड संघात पहिला सामना होणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि बीओजीने व्हर्च्युअल बैठकीनंतर जाहीर केलं.
पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर. कोरोना व्हायरस प्रकरणांमुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. लाहोर कलंदर (Lahore Qalandars) विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) संघात पहिला सामना होणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आणि बीओजीने व्हर्च्युअल बैठकीनंतर जाहीर केलं. अंतिम सामना 20 जून रोजी खेळला जाईल. सर्व सामने कराची नॅशनल स्टेडियमवर (Karachi National Stadium) खेळले जातील. सदस्यांना सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी 22 मे पासून एका हॉटेलमध्ये आणि त्यानंतर तीन दिवसांच्या प्रशिक्षण सत्रात सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)